बिटकॉइन गुन्ह्याचा तपासात तत्कालीन पाेलीस अधिकारी सहभागी असण्याची शक्यता असून तपासात सहभागी पाेलीस अधिकाऱ्यांची चाैकशी करण्यात यावी. तसेच गुन्हयाची व्याप्ती माेठी असल्याने सरकारने या गुन्हयाचे तपासासाठी तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी बीटकाॅईन गुंतवणुकदारांचे वतीने करण्यात आली आहे.Bitcoin investerse demanded enquiry of Bitcoin fraud case invistigate officers
विशेष प्रतिनिधी
पुणे –पुण्यात सन २०१८ मध्ये दत्तवाडी व निगडी पाेलीस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकाॅईन गैरव्यवहारात पाेलीसांना सायबर तज्ञ म्हणून मदत करणाऱ्या पंकज घाेडे आणि रविंद्र पाटील यांना बीटकाॅईन परस्पर त्यांच्या खात्यावर वर्ग करुन घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा कट केवळ त्यांचाच नसून यात तत्कालीन पाेलीस अधिकारी सहभागी असण्याची शक्यता असून
तपासात सहभागी पाेलीस अधिकाऱ्यांची चाैकशी करण्यात यावी. तसेच गुन्हयाची व्याप्ती माेठी असल्याने सरकारने या गुन्हयाचे तपासासाठी तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी बीटकाॅईन गुंतवणुकदारांचे वतीने हेमंत दवे आणि निशा रायसाेनी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दवे म्हणाले, या गुन्हयात अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचा सहभाग असून त्यांनी लाखाे बिटकाॅईनचा अपहार केलेला आहे. याबाब उच्चस्तरीय तज्ञांची चाैकशी समिती नेमावी, ब्लाॅकचेन मध्ये बिटकाॅईनचे ट्रँझँक्शनचे अचूक तपासासाठी चैन अनालिसीस साॅफ्टवेअरची मदत घेण्यात यावी.
आराेपी रविंद्र पाटील याने केपीएमजी कंपनी साेबत मिळून एकूण किती बीटकाॅईन लंपास केले त्याचा तपास करण्यात येऊन संबंधित कंपनी विराेधातही गुन्हा दाखल करण्यात यावा. रविंद्र पाटील याची मालमत्ता जप्त करण्यात यावी.
देशभरात बीटकाॅईनचे ४२ गुन्हे दाखल
भारद्वाज बंधूनी केलेल्या बिटकाॅईन चाेरीची व्याप्ती जगभरात असून त्यांच्यावर महाराष्ट्रात पुणे, नांदेड, काेल्हापूर, मुंबई, ठाणे, नागपूर, काेल्हापूर येथे एकूण १२ गुन्हयांची नाेंद झालेली आहे. तर देशभरात विविध राज्यात अशाप्रकारे एकूण ४२ गुन्हयांची नाेंद आहे. सदर चाेरीच्या तक्रारीची दखल प्रवर्तन निर्देशालय मुंबई यांनी घेतली
असून मनी लाॅन्ड्रींगचा तपास पीएमएलए अॅक्ट अंर्तगत सुरु आहे. त्यांनी गुन्हयाचे मूल्यांकन २० हजार काेटी रुपये केले अाहे. भारद्वाज बंधूनी दहा बिटकाॅईनच्या माेबदल्यात १८ बीटकाॅईन १८ महिन्यात परत देण्याचा करार करत गुंतवणुकदारांची फसवणुक केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App