इगतपुरी येथे रेव्ह पार्टी, बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह बिग बॉसच्या अभिनेत्रीला पकडले, दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा

इगतपुरी येथे दोन बंगल्यात सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावला. बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्रीसह दहा पुरुष आणि १२ महिला मिळून एकुण २२व्यक्ती ड्रग्ज, कोकेन, गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना पोलिसांना सापडले. Bigg Boss actress, Bollywood choreographer and 22 high profile caught by police at Igatpuri in rave party


विशेष प्रतिनिधी

नाशिक : इगतपुरी येथे दोन बंगल्यात सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावला. बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्रीसह दहा पुरुष आणि १२ महिला मिळून एकुण २२व्यक्ती ड्रग्ज, कोकेन, गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना पोलिसांना सापडले.

इगतपुरी येथील दोन खासगी बंगल्यात शनिवारी (दि.२६) मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारखे अंमली पदार्थांची नशा करत बॉलिवुडशी संबंधित चार महिलांसह एकुण २२ उच्चभ्रू पार्टी करत असल्याची गोपनीय माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. हुक्का,चरस, गांजा, कोकेनसारखे अंमली पदार्थाचेही सेवनही सुरु होते. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा मारुन या सर्वांना ताब्यात घेतले. सर्वांना ताब्यात घेत पोलिस वाहनातून इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले.

विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामुहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१०पुरुष, १२ महिलांसह एकुण २२ जण इगतपुरी येथील स्काय ताज व्हीला व स्काय लगुन व्हिला या आलिशान बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी करताना सापडले. यामध्ये पाच महिला बॉलिवुडशी संबंधित असून एक विदेशी महिलेचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला इराणची नागरिक असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

रेव्ह पार्टी करण्यासाठी इगतपुरीत आलेल्यानी आपल्यासोबत अंमली पदार्थांचा मोठा साठा मुंबईतून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. हा पुरवठा कोठून आणि कोणी केला याबाबतचा तपास करण्याकरिता नाशिक ग्रामीण पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तातडीने मुंबईत रवाना करण्यात आले आहे.

यामध्ये दोन कोरियोग्राफर, एक रिॲलिटी शोमधील अभिनेत्री आणि एक विदेशी महिलेचा समावेश आहे. कोकेनसारखे अंमली पदार्थांचे सेवन या सर्वांकडून केले जात होते. अंमली पदार्थाचा पुरवठा कोणी व कोठून केला? यांच्यासोबत अजून काही साथीदार होते का? आदी बाबींचा तपास केला जात आहे,असे नाशिकचे पोलीस अधीक्षक
सचिन पाटील यांनी सांगितले.

Bigg Boss actress, Bollywood choreographer and 22 high profile caught by police at Igatpuri in rave party

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात