बिग बॉस सीझन 14 संपल्यापासून आता ‘बिग बॉस 15’ ची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नव्या 15 व्या सीझनची निर्मात्यांनी तयारी सुरू केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बिग बॉसच्या 15 व्या सिझन मध्ये सेलिब्रिटींसोबतच सामान्य नागरिकही असणार आहेत. शोबद्दल आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार शोच्या निर्मात्यांनी यावर्षी शोमध्ये भाग घेण्यासाठी रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडेसोबत संपर्क साधला आहे.यामुळे चाहते उत्सुक आहेत या दोघी जर बिग बॉसच्या घरात एकत्र आल्या तर नक्कीच दंगल होणार . Bigg Boss 15: ‘Now there will be riots…’! Ankita Lokhande- Riya Chakraborty will come to Bigg Boss’s house
मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉसच्या निर्मात्यांनी शोमध्ये भाग घेण्यासाठी रिया चक्रवर्ती यांच्याकडे संपर्क साधला आहे. सोबतच असंही म्हटलं जात आहे की रिया जर या शोमध्ये प्रवेश करायला तयार असेल तर निर्माते अंकिता लोखंडे यांना शोमध्ये सहभागी होण्यासाठीही आमंत्रित करतील. मात्र अद्याप निर्मात्यांकडून याबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे .अंकिता लोखंडे आणि रिया दोघींनीही अभिनेता सुशांत सिंहला डेट केलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर दोघीही आमने सामने आल्या होत्या.
अशा परिस्थितीत बिग बॉसच्या घरात दोन्ही अभिनेत्री एकत्र आल्या तर सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरू शकतो. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की दोन अभिनेत्रींमध्ये सुशांतसिंह राजपूतबाबत वाद होऊ शकतो. ‘बिग बॉस’ 15 शो चे निर्माते नियोजन करत आहेत की ऑडिशनच्या माध्यमातून निवडले जाणारे सर्वसाधारण लोक आधी घरात ठेवले जातील.’बिग बॉस’ 15 मध्ये, सेलिब्रिटींच्या आधी सामान्य लोकांना घरात आणलं जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App