ही मेट्रो वनाझ ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो विना चालक धावणार आहे. तर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मार्ग लवकरच सुरू होणार आहे.Big news: Now Pune Metro will run without driver.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे मेट्रो ही स्वयंचलित असून ती विना चालक धावणार आहे. ही पुणे मेट्रो ऑटोमोड असणार आहे. ही मेट्रो वनाझ ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो विना चालक धावणार आहे. तर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मार्ग लवकरच सुरू होणार आहे.
वनाझ ते रामवाडी, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ,शिवाजीनगर ते हिंजवडी या तिन्ही मार्गांचे नियंत्रण मेट्रोचे टर्मिनल असलेल्या शिवाजीनगर येथील धान्य गोडाऊन स्थानकावर असणार आहे.
मेट्रो ट्रेनच्या आतमध्ये आणि मेट्रोच्या स्थानकातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे असतील.या सीसीटिव्ही कॅमेर्यांचे नियंत्रण कक्ष शिवाजीनगरला असणार आहे. त्यामुळे येथुन मेट्रोवर नियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे मेट्रो चालकाची गरजच भासणार नाही.
पुणे मेट्रो मार्ग संपूर्ण तयार झाल्यानंतर मेट्रो अवघ्या साठ सेंकदाला येणार आहे. या मेट्रोच विशेष म्हणजेलक्ष्मी रस्त्यावरील खरेदी, बालगंधर्वला नाटक,आयनॉक्स किंवा ई स्क्वेअरला सिनेमा असो कि दगडूशेट गणपतीचे दर्शन मेट्रोच्या मार्गावर आहेत. त्यामुळे प्रवाशांना सगळ्या सुविधा मिळणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App