जळगावमध्ये एसटी कर्मचऱ्यांच कुटुंबासह ‘भीक मांगो’ आंदोलन


महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनात भीक मागून जमा झालेली रक्कम एसटी कर्मचारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत.’Bhik Mango’ agitation with family of ST employees in Jalgaon


विशेष प्रतिनिधी

जळगाव : गेल्या अडीच महिन्यांपासून पुकारलेल्या एसटी संपाचा तिढा काही संपायचं नाव घेईना.शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता.परंतु विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसल्यानं अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली तर काहींनी आंदोलन पुकारलं.दरम्यान सध्या जळगावमध्ये एसटी कर्माचारी आणि त्यांच्या कुटुंबाचं ‘भीक मांगो’ आंदोलन सुरु आहे.



प्रजासत्ताक दिनानिमित्त हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्टँडपर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.दरम्यान महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनात भीक मागून जमा झालेली रक्कम एसटी कर्मचारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत.म्हणून आता सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागलं आहे.

‘Bhik Mango’ agitation with family of ST employees in Jalgaon

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात