मंगळवारी अॅमेझॉन कंपनीशी संबंधित सेलरवर हबीबगंज येथील शुभम नायडू यांनी एफआयआर दाखल केली. नायडू एका खासगी कंपनीत काम करतात.Bhopal: Tricolor printed shoes sold, FIR filed against Amazon seller; Home Minister Mishra directed action
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे अॅमेझॉनच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा प्रजासत्ताक दिनापूर्वी अमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने तिरंग्याचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर तिरंगा छापलेले शूज विकले गेले.
दरम्यान यावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले. यावेळी मिश्रा यांच्या निर्देशानंतर सहा तासांच्या आतच मंगळवारी अॅमेझॉन कंपनीशी संबंधित सेलरवर हबीबगंज येथील शुभम नायडू यांनी एफआयआर दाखल केली. नायडू एका खासगी कंपनीत काम करतात.
अॅमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सेल सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सेलसोबतच राष्ट्रध्वज छपलेले शूज विक्रीचे फोटोही देण्यात आले आहेत. सोशल मीडिया यूजर्स याप्रकरणी कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत.
यावेळी गृहमंत्री मिश्रा म्हणाले की अॅमेझॉन कंपनीबाबत जी माहिती समोर आली आहे, ती वेदनादायक असून मध्य प्रदेशात हे खपवून घेतले जाणार नाही. देशाचा अपमान होईल, असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. असे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App