“माझे मार्गदर्शक, माझे हिरो ” अदर पुनावाला यांनी वडीलांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यक्त केला आनंद


सर्व १२८ पुरस्कार विजेते हे खरोखरच पुरस्कारासाठी पात्र आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. “My guide, my hero” Adar Punawala expressed happiness over his father’s Padma Bhushan award


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. त्यात राज्यातील दहा जणांचा समावेश आहे.दरम्यान ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान अदर पूनावाला म्हणजे सायरस पूनावाला यांचा मुलगा यांनी स्वत:च्या बालपणीचा एक फोटो पोस्ट करत आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत.तसेच सर्व १२८ पुरस्कार विजेते हे खरोखरच पुरस्कारासाठी पात्र आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.

अदर पुनावाला ट्विटरवरुन आपल्या भावाना व्यक्त करत म्हणाले की , ”या वर्षी पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो.मी भारत सरकारचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील डॉक्टर सायरस पूनावाला यांच्या कामाची दखल घेतली,’ असं अदर पूनावाला म्हणाले आहेत.

तसेच या ट्विटसोबत अदर पूनावाला यांनी एक जुना फोटो ट्विट केला आहे. यामध्ये अगदीच एक दीड वर्षांचे असून विलू सायरस पूनावाला यांच्या कुशीत असणारा चिमुकला मुलगाच अदर पुनावाला आहेत.

“My guide, my hero” Adar Punawala expressed happiness over his father’s Padma Bhushan award

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय