प्रतिनिधी
ठाणे : मोबाइल स्मार्टफोनच्या दुष्परिणामांवर नेहमीच सांगितले जाते. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते लोकमतच्या साहित्य पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. नेमाडे म्हणाले की, स्मार्टफोनमुळे मेंदुचा एकच भाग काम करतो हे न्युरोलॉजिस्टनेही सिद्ध केले आहे.Bhalchandra Nemade said- Smartphones reduce brain capacity, Govt should ban smartphones and English schools!!
ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांतून शिक्षण घेण्याचे प्रमाण भयंकर आहे. स्मार्टफोन आणि इंग्रजी शिक्षण या दोन्ही बाबी चुकीच्या असून सरकारने आता यावर कायदेशीर बंदी घातली पाहिजे. ठाण्यातील या कार्यक्रमात अनेक दिग्गल साहित्यिकांनी हजेरी लावली होती. नेमाडे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नेमाडे म्हणाले की, “युरोपातही सध्या मोबाइलवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे. मोबाइलमुळे मेंदूतील एकूण 50 ते 60 सेंटर्सपैकी फक्त एकच सेंटर काम करते. मोबाइलमुळे एकच सेंटर काम करतं हे न्युरोलॉजिस्टनंही सिद्ध केलं आहे. त्यामुळे कायदेशीररित्या मोबाइलवर बंदी घातली गेली पाहिजे.”
स्मार्टफोनच्या वापरावर बंदीची जशी गरज आहे तशीच इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही बंदीची गरज आहे. कोरिया, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी हे कुणीच इंग्रीज शिकवत नाहीत. तिथं दोन-चार लोक इंग्रजी शिकून घेतात. पण आपल्या देशात 40 ते 50 टक्के लोक इंग्रजी शिकतात. इंग्रजी मीडियममध्ये शिकतात हे चुकीचं आहे. हे कायद्यानेच बंद करण्याची परिस्थिती आज आली आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App