विशेष प्रतिनिधी
पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटींग घेणाऱ्या पुण्यातील दोन इंटरनॅशनल बुकींना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून एक कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.Betting on IPL, ‘International Cricket Bookies’ from Pune detained
पुण्यात मोठ्या प्रमाणावर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार कारवाई करीत या ‘इंटरनॅशनल क्रिकेट बुकी’ना ताब्यात घेण्यात आले. सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करीत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात केली आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भुतडा हा देशातील एक बड़ा क्रिकेट बुकी म्हणून ओळखला जातो. अशोक देहुरोडकर हा देखील महाराष्ट्रातील मोठा बुकी आहे. समर्थ आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यात मोठया प्रमाणावर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर क्रिकेट बेटींग सुरू असल्याची माहिती आयुक्त गुप्ता यांना मिळाली होती. मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापेमारी केली.
गणेश भुतडा आणि देहुरोडकर यांच्याकडील डायऱ्या, मोबाईल आणि इतर काही कागद पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामध्ये अनेकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर त्यांना वेळोवेळी मदत करणान्यांची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे
. या कारवाई नंतर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लोणावळा आणि मुंबईतील काही बुकी गायब झाले आहेत. भुतडा आणि देहुरोडकर यांचे कोणा-कोणाशी संबंध आहेत याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App