प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजीराजे आज सकाळी चहापानासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. संभाजी राजे यांची खासदारकीची मुदत 2 मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर या दोन खासदारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.Before the expiration of the term, MP Sambhaji Raje called on MP Sanjay Raut
मी चहापानाला येतो, असे मी संजय राऊत यांना सांगितले होते. दिल्लीत दोन खासदार एकमेकांकडे जाणे येणे सहज असते. यात कोणतेही राजकीय कारण नाही, असे वक्तव्य संभाजीराजे यांनी खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यासमोर पत्रकारांशी बोलताना केले.
पंतप्रधान मोदी यांचे काल संसदेतील भाषणात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसनेही त्यांच्यावर पलटवार केला. या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता खासदार संभाजीराजे यांनी या विषयावर मी 2 मे नंतर बोलेन. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे मी कोणत्याही विषयावर भाष्य करत नाही, असे सूचक वक्तव्य केले आणि नंतर ते संजय राऊत यांच्या निवासस्थानात चहापानासाठी गेले.
लतादीदींचे शिवतीर्थावर स्मारक : संजय राऊतांच्या सूरात मिसळला मनसेने सूर!!
संभाजीराजे यांची नियुक्ती राज्यसभेवर करण्याची शिफारस महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सरकारने केली होती. त्यावर एक राजकीय वाद देखील रंगला होता. आत्तापर्यंत छत्रपती पेशव्यांची नेमणूक करतात हे माहिती होते. पण आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले आहेत, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या वेळी केली होती.
केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना संभाजी राजे यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. आता केंद्रात भाजपचे सरकार असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार आहे. या पार्श्वभूमीवर आपली मुदत संपण्यापूर्वी खासदार संभाजीराजे हे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App