वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग आज पहाटेच्या सुमारास कोसळून १३ मजूर जखमी झाले होते. बेअरिंग आणि नट बोल्टमध्ये त्रुटी राहिल्याने पुलाचा गर्डर कोसळला, असा प्राथमिक अंदाज आहे. दोषींवर चौकशीअंती कारवाई केली जाईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.Bearings and nut bolts Error may have caused the flyover girder to collapse due to an error; Action against the culprits: Urban Development Minister Eknath Shinde
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुलाची पाहणी केली. तेव्हा ते बोलत होते. वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या या पुलाचा गर्डर पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कोसळला होता. या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच जखमी कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
‘दुर्घटना पूर्णपणे दुर्दैवी असून जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये, यासाठी पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.
जखमी कामगाराची घेतली भेट
दुर्घटनेतील जखमी १३ कामगारांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला तर एका कामगार डॉक्टरांचे उपचार घेत होता. व्ही. एन. देसाई रुग्णालयात जाऊन या कामगाराची विचारपूस मंत्री शिंदे यांनी केली. तसेच त्याच्यावर नीट उपचार करण्याच्या सूचना डॉक्टराना दिल्या. यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही श्रीनिवास राव, स्थानिक पोलीस अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App