गणपती विसर्जनानंतर मनसेसह विविध स्वयंसेवी संस्थांची समुद्र किनारी स्वच्छता मोहीम


प्रतिनिधी

मुंबई : गणपती विसर्जनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी मुंबई सह अनेक शहरांमधील समुद्रकिनारे स्वच्छता करण्याची मोहीम आज हाती घेतली. Beach cleaning campaign by various NGOs including MNS after Ganapati immersion

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनसेची मोहीम आधीच जाहीर केली होती त्यानुसार आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेक पर्यावरणप्रेमींसह अमितजी ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला.

याप्रसंगी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक हजर होते.
शेकडो महाविद्यालयीन तरुण तरुणी हेसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. आज शनिवार सकाळी मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी ८ ते १० दरम्यान पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक तसंच विद्यार्थी सहभागी झाले.

या सर्वांनी गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपविले.

Beach cleaning campaign by various NGOs including MNS after Ganapati immersion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात