सप्टेंबरमध्ये सात दिवस बँका राहणार बंद; १० ते १२ सप्टेंबर सलग तीन दिवस टाळे

वृत्तसंस्था

मुंबई : सप्टेंबर महिन्यात ‘हे’ सात दिवस बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर सुरु व्हायला २ दिवस आहेत. सप्टेंबरमध्ये तुमची ही कामं पूर्ण करता येणार आहे. कारण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बँकांना कमी दिवस सुट्या आहेत. Bank Holiday September Month Banks Closed For 7 Days

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्याच्या कॅलेंडरनुसार, सप्टेंबरमध्ये बँकांना शनिवार आणि रविवार मिळून एकूण ७ दिवसांची सुटी आहे. या ७ सुट्यापैकी १०, ११ आणि १२ सप्टेंबर अशा सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे, अत्यंत महत्त्वाची काही कामं असतील तर ती १० तारखेच्या आधीच करा. कारण, १० तारखेला गणेश चतुर्थी, ११ रोजी दुसरा शनिवार तर १२ सप्टेंबरला रविवार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून राज्यनिहाय पारंपरिक सण उत्सव, धार्मिक तसेच अन्य महत्त्वाच्या दिवशी सुट्या जाहीर केल्या जातात. त्याप्रमाणे, सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्या अंतर्गत आठवड्याच्या सुट्या वगळता (शनिवार, रविवार) भारतीय रिझर्व्ह बँकेने अन्य सुट्या देशातील सगळ्याच बँकांना लागू असतील असे नाही.

सप्टेंबर महिन्यात या दिवशी बँका बंद

५ सप्टेंबर : रविवार
१० सप्टेंबर : गणेश चतुर्थी
११ सप्टेंबर : दुसरा शनिवार
१२ सप्टेंबर : रविवार
१९ सप्टेंबर : रविवार
२५ सप्टेंबर : चौथा शनिवार
२६ सप्टेंबर : रविवार

Bank Holiday September Month Banks Closed For 7 Days

महत्त्वाच्या बातम्या