जातपात आणि घराण्यांच्या पलिकडल्या सामान्य माणसाच्या हाती बाळासाहेबांमुळे सत्ता; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली


महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तैलचित्राचे अनावरण

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील 23 जानेवारी 2023 रोजीची सायंकाळ संपूर्ण टीव्ही स्क्रीनवर फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांची होती. महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या समारंभाला बाळासाहेबांचे सर्व वैचारिक अनुयायी उपस्थित होते. या सर्वांनी बाळासाहेबांच्या व्यक्तिगत, राजकीय आणि सामाजिक आठवणी सांगितल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या राजकारण आणि समाजकारणाचे वैशिष्ट्य सांगताना बाळासाहेबांनी महाराष्ट्रात जातीपातीच्या पलिकडे आणि घराणेशाहीच्या पलिकडे जाऊन सर्वसामान्य माणसाच्या हाती सत्तेची पदे दिली, हे आवर्जून सांगितले. Balasaheb Thackeray broke Dynasty politics in maharashtra, CM eknath shinde and dy cm devendra Fadanavis paid humble tribute

महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या आधी काही विशिष्ट घराण्यांमध्ये सत्ता होती. ती बाळासाहेबांनी मोडली आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला, ज्याच्या घराण्यात कुणी आमदार खासदार मंत्री नव्हते अशांना सत्तेच्या पदावर नेऊन बसवले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.



बाळासाहेबांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही. कोणत्या मतदारसंघात कोणती जात प्रभावी आहे, कोणता समाज प्रभावी आहे, त्याचाच उमेदवार दिला म्हणजे तो निवडून येईल, असा कोता विचार कधी केला नाही. त्यांनी आपल्या करिश्माच्या बळावर छोट्यातल्या छोट्या समाजाच्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उभे करून निवडून आणून दाखवले, याची आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. याच आठवणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला. बाळासाहेबांनी घराणेशाहीच्या पलिकडे जाऊन देखील सर्वात सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या पदावर बसवण्याची आठवण सांगितली. महाराष्ट्रातली राजकीय घराणेशाही बाळासाहेबांनी मोडल्याचे त्यांनी सांगितले.

या देशातल्या पंतप्रधानांना मोठमोठ्या मंत्र्यांना पाकिस्तान घाबरत नव्हता. तर फक्त एका नावाला घाबरत होता, ते नाव बाळासाहेब ठाकरे होते, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. बाळासाहेबांच्या अनेक व्यक्तिगत आठवणी मुख्यमंत्र्यांनी शेअर केल्या. नारायण राणे, छगन भुजबळ, रामदास कदम, वसंत डावखरे यांच्याबरोबरच्या आठवणी देखील मुख्यमंत्र्यांनी शेअर केल्या.

टीव्ही स्क्रीनवर फक्त बाळासाहेब

आजची संपूर्ण सायंकाळ महाराष्ट्रातल्या टीव्ही स्क्रीनवर फक्त बाळासाहेबांची होती. एकीकडे महाराष्ट्राच्या विधिमंडळात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण होत होते, तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बाळासाहेब ठाकरे जयंती मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये सुरू होता. त्यामुळे टीव्ही स्क्रीन दोन कार्यक्रमांमध्ये विभागला गेला होता. पण हे दोन्ही कार्यक्रम बाळासाहेबांचा वारसा आपल्याच कडे आहे हे सांगण्यासाठी होते. महाराष्ट्राच्या राजकारणात या अर्थाने देखील घराणेशाही मोडली गेली आहे.

Balasaheb Thackeray broke Dynasty politics in maharashtra, CM eknath shinde and dy cm devendra Fadanavis paid humble tribute

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात