विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसापासून मराठी चित्रपट विश्वातं आपलं एक वेगळंच गारुड निर्माण करणारा, सैराट नंतर महाराष्ट्राचा महा सिनेमा ठरलेला आणि लवकरच 100 कोटीच्या क्लब मध्ये जमा होणारा बाई पण भारी देवा हा सिनेमा, महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांचा लोकप्रिय सिनेमा ठरतोय. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही सिनेमा पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली. हैद्राबादमध्ये सुद्धा महिलांनी बाईपण भारी देवा पहायला थिएटर हाऊसफुल्ल केलं.बाईपण भारी देवा ला प्रेक्षकांनी डोक्यावर केलं. अशातच बाईपण भारी देवाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु झालीय. Bai Pan Bhari Deva Movie News
बाई पण भारी देवा या सिनेमाची कथा पटकथा संगीत आणि त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या दिग्गज नायका या सगळ्यांमुळे या चित्रपटाची भट्टी जमून आली. महिला वर्गाना तर या सिनेमाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर उचलून धरलं. अनेक चित्रपटगृहात केवळ महिलांसाठीचे खास शो आयोजित करण्यात आले . आणि महिला नटून थटून नथ गॉगल लावून मिरवण या बाई पण भारी देवा या सिनेमाचा आस्वाद घेताना दिसल्या.
या सिनेमातील गाण्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर रील शेअर करण्यात आल्यात.
View this post on Instagram A post shared by 𝗢𝗺𝗸𝗮𝗿 𝗠𝗮𝗻𝗴𝗲𝘀𝗵 𝗗𝗮𝘁𝘁 🕉 / writer – Director (@omkar_mangesh)
A post shared by 𝗢𝗺𝗸𝗮𝗿 𝗠𝗮𝗻𝗴𝗲𝘀𝗵 𝗗𝗮𝘁𝘁 🕉 / writer – Director (@omkar_mangesh)
प्रचंड लोकप्रियता मिळवलेला आहे. या सिनेमाचा दुसरा सिक्वेल येणार का? याबाबतही अनेकांच्या मनात शंका आहे. बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये बाईपण भारी देवा ची कथाकार वैशाली नाईक बाईपण.. साठी काम केलेला लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार ओंकार दत्त पहायला मिळत आहेत.
“एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी..” असं कॅप्शन दिलंय. या फोटोला चाहत्यांनी पसंती दिलीय. बाईपण भारी देवा सिनेमाच्या या टीमला पाहून अनेकांना सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरु झालीय, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App