सकाळी मोदी गो बॅक च्या घोषणांची गाणी; दुपारी मोदींच्या रोड शो ने विरोधकांवर फेरले पाणी!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : सकाळी मोदी गो बॅक च्या घोषणांची विरोधक गात होते गाणी, पण दुपारी मोदींच्या रोडशो ने विरोधकांवर फिरले पाणी!!, असेच पुण्यातले आजचे चित्र होते.Modi’s road show in pune fracture opposition agitation against him

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळा एस. पी. कॉलेजच्या मैदानावर झाला. त्याआधी सर्व विरोधकांनी टिळक चौकात एकत्र जमून मोदी गो बॅक घोषणा दिल्या. विरोधकांमधल्या काही कलापथकांनी मोदींविरोधात गाणी सादर केली. पोलिसांनी त्यांना तिथेच अडवून ठेवले होते.



एकीकडे विरोधकांची मोदी विरोधातली गाणी सुरू असताना दुसरीकडे एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळा झाला. त्यानंतर पुण्यातल्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. मोदी तिथून बाहेर पडले आणि त्यांनी गाडीत बसूनच काही किलोमीटर पर्यंत रोड शो केला. या रोड शो ला लक्ष्मी रस्त्यावर पुणेकरांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की विरोधकांच्या सकाळच्या मोदी गो बॅक च्या घोषणांवर आणि मोदी विरोधी गाण्यांवर पाणी फेरले गेले.

पवारांनी विरोधकांना केले निराश

शरद पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून काँग्रेस सह बाकीच्या विरोधकांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले. मणिपूरच्या मुद्द्यावरून व्यासपीठावरून मोदींना सुनवा, अशी सूचना काही काँग्रेस नेत्यांनी त्यांना केली होती. पण पवारांनी आपल्या भाषणात मणिपूर मधला “म” देखील उच्चारला नाही. त्यामुळे काँग्रेस सह सर्व विरोधकांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यानंतर मोदींनी रोड शो करून बाकीच्या विरोधकांच्या घोषणाबाजी वर पाणी फेरून टाकले!!

Modi’s road show in pune fracture opposition agitation against him

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात