बाई पण भारी देवा, नंतर आता आणखी काहीतरी भारी ; दिग्दर्शक केदार शिंदेंनी शेअर केला फोटो


विशेष प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही दिवसापासून मराठी चित्रपट विश्वातं आपलं एक वेगळंच गारुड निर्माण करणारा, सैराट नंतर महाराष्ट्राचा महा सिनेमा ठरलेला आणि लवकरच 100 कोटीच्या क्लब मध्ये जमा होणारा बाई पण भारी देवा हा सिनेमा, महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांचा लोकप्रिय सिनेमा ठरतोय. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही सिनेमा पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली. हैद्राबादमध्ये सुद्धा महिलांनी बाईपण भारी देवा पहायला थिएटर हाऊसफुल्ल केलं.बाईपण भारी देवा ला प्रेक्षकांनी डोक्यावर केलं. अशातच बाईपण भारी देवाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु झालीय. Bai Pan Bhari Deva Movie News

बाई पण भारी देवा या सिनेमाची कथा पटकथा संगीत आणि त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या दिग्गज नायका या सगळ्यांमुळे या चित्रपटाची भट्टी जमून आली. महिला वर्गाना तर या सिनेमाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर उचलून धरलं. अनेक चित्रपटगृहात केवळ महिलांसाठीचे खास शो आयोजित करण्यात आले . आणि महिला नटून थटून नथ गॉगल लावून मिरवण या बाई पण भारी देवा या सिनेमाचा आस्वाद घेताना दिसल्या.

या सिनेमातील गाण्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर रील शेअर करण्यात आल्यात.

प्रचंड लोकप्रियता मिळवलेला आहे. या सिनेमाचा दुसरा सिक्वेल येणार का? याबाबतही अनेकांच्या मनात शंका आहे. बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये बाईपण भारी देवा ची कथाकार वैशाली नाईक बाईपण.. साठी काम केलेला लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार ओंकार दत्त पहायला मिळत आहेत.

“एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी..” असं कॅप्शन दिलंय. या फोटोला चाहत्यांनी पसंती दिलीय. बाईपण भारी देवा सिनेमाच्या या टीमला पाहून अनेकांना सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरु झालीय, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Bai Pan Bhari Deva Movie News

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात