विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : माघशुध्द एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आकर्षक नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास केली आहे… Attractive flower arrangement at Sri Vitthal Rukmini Temple on the occasion of Maghshuddha Ekadashi
माघवारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक आज पंढरीत दाखल झाले असून कार्तिक नंतर निर्बंध शिथील असणारी माघीवारी दुसरीच यात्रा होय. पंढरीत भाविकांची गर्दी वाढली असून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चार दर्शनमंडप उभारले आहेत सध्या दर्शन रांग दोन किलोमीटर पर्यंत पोहचली आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क सक्तीचे असणार आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडपसह देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून सावळ्या विठु रूखमायचे रूप पाहून भाविक आनंदी आनंद होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App