मांजरीच्या माजी उपसरपंचावर गोळीबार, वार करून केला खूनाचा प्रयत्न


हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसऱ्याशी भांडणे झाले असताना त्याने साथीदारांना बोलावून मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार करुन त्यांच्या डोक्यात दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळी चुकविल्याने सरपंच बचावले असले तरी त्यांच्या डोक्यात वार केल्याने जबर जखमी झाले आहेत. Attempted murder by firing on a Manjari former deputy Sarpanch


विशेष प्रतिनिधी

पुणे : हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसऱ्याशी भांडणे झाले असताना त्याने साथीदारांना बोलावून मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार करुन त्यांच्या डोक्यात दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळी चुकविल्याने सरपंच बचावले असले तरी त्यांच्या डोक्यात वार केल्याने जबर जखमी झाले आहेत.

पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर असे मांजरीच्या सरपंचाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले.

धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली. दगड डोक्यात घातल्याने त्यात ते जबर जखमी झाले. कोणी वाचवायला आले तर त्यांचीही अशीच गत करु अशी धमकी देऊन ते पळून गेले. धारवाडकर यांना तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्यावर ८ टाके घालण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Attempted murder by firing on a Manjari former deputy Sarpanch

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात