इस्लामपुरात एकाच वेळी ३५ जुळी व्यासपीठावर; २२-२-२२ तारखेचा अनोखा योगायोही जुळला


विशेष प्रतिनिधी

सांगली : एकाच वेळी विविध वयोगटातील जुळ्यांना पाहणे हा दुर्मिळ योगायोग २२-२-२२ या तारखेला जुळून आला. इस्लामपुरच्या मुक्तांगण प्ले स्कूलच्या प्रांगणात..! ट्विन्स २२ उपक्रमात तब्बल ३५ जुळी व्यासपीठावर आली. त्यांनी आपल्या कला सादर केल्या. चेहऱ्यातील प्रचंड साम्य आणि विविध वेशभूषेत आलेल्या जुळ्यांचा आविष्कार पाहून कार्यक्रमात रंगत आली. गणेश,स्वरा, सई कुंभार या तिळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. At the same time in Islampur, 35 twins on stage; The unique coincidence of 22-2-22 also matched

इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल मुलांचे बालपण टिकवण्यासाठी गेली ११ वर्षे प्रयत्न करीत आहे. दरम्यान, तेरा जुळी आणि एक तिळयाने मुक्तांगण मध्ये शिक्षणाचं पाहिलं पाऊल टाकले आहे. हा इतिहास आणि २२-२-२२ अशी तारीख निवडली गेली.आणि जुळ्यांना निमंत्रणे दिली गेली. सोशल मीडियावर या उपक्रमाची माहिती व्हायरल झाल्यावर उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. नुकत्याच जन्मलेल्या बालकापासून ५५ वर्षाच्या व्यक्ती या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाबाबत अरविंद कोळी यांनी रेखाटलेला फलक लक्षवेधी ठरला.



जुळी मुले हा आजही समाजामध्ये कौतुकाचा व कुतूहलाचा विषय आहे.त्यामुळे मुक्तांगणमध्ये हा आगळावेगळा कौतुक सोहळा पार पडला. स्कूलच्या आवारात आकर्षक मंडप उभारला होता. व्यासपीठावर फुग्यांनी सजावट केली होती. अनेकदा जुळी मुलं पहायला मिळत नाहीत.पण एकाच वेळी आलेली मुलं पहायला पालकही उत्सुक होते. आज मुलांनी योगा, डान्स, नाट्य, बडबडगीते, पोवाडा, पसायदान,बालगीते म्हटली.

उपक्रमाबाबत मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते म्हणाले,” वेगवेगळ्या उपक्रमांनी मुक्तांगणमध्ये चार वर्षाच्या आतील मुलांना अनुभव दिले जातात. दरवर्षी जुळी मुलं वर्गात असणं हे आमच्या स्कूलचे वैशिष्ट्य आहे. याला जोड म्हणून अनोख्या तारखेला एकाच व्यासपीठावर जुळी आणण्याचा प्रयत्न होता. त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. सर्वांनी एन्जॉय केला. खुर्षद पटवेकर,धनश्री पाटील,भारती उथळे, आरती धोतरे यांनी संयोजन केले.
मुक्तांगणच्या संचालिका सौ. वर्षाराणी मोहिते म्हणाल्या, अनोख्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आजचा दिवस मुक्तांगण मूळे जुळ्यांना दीर्घकाळ लक्षात राहील.”

At the same time in Islampur, 35 twins on stage; The unique coincidence of 22-2-22 also matched

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik ED : ईडीच्या कार्यालयात धडक मारण्याचा शरद पवारांना “सल्ला” देणारे नवाब मलिक स्वतःच ईडीच्या जाळ्यात!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”