राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची नियमावली राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने आज जाहीर केली आहे.At last the moment has come! Cinemas and theaters will be opened in the state; But the rules will be ‘this’
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह उघडण्यास तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे.या निर्णयानुसार राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची नियमावली राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने आज जाहीर केली आहे.
राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी २५ सप्टेंबरच्या बैठकीत घेतला होता.नाट्यगृह, चित्रपटगृह उघडण्याचा आणि इतर महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
१)प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी नाही.
२)जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
३)कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
४)मास्क, सॅनिटायजरचा वापर करणे आवश्यक.
५)प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.
६)केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करावे.
७)आरोग्यसेतू अॅप बंधनकारक आहे.
८)कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
९)५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.
१०)आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App