विशेष प्रतिनिधी
कोलकता – कोलकता शहरातील ७० वर्षीय व्यक्तीने विवाह करण्यासाठी वधू हवी अशी जाहिरात दिली असता एक दो नव्हे तर विवाहइच्छुकांचे तब्बल ७० प्रस्ताव आले आहेत. विशेष म्हणजे अनेक मुलींचे वय २५ ते २६ आहे.At age of 70 old person gave for marrage
वायव्य कोलकता येथील रहिवासी असलेले जाहिरातदार हे रिझर्व्ह बँकेतील निवृत्त व्यवस्थापक आहेत आणि त्यांना निवृत्ती वेतनही सुरू आहे. या व्यक्तीने स्थानिक बंगाली वृत्तपत्रात जाहिरात दिली आणि जाहिरातीत ५० वयोगटातील वधू हवी असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात संपर्क करण्यासाठी त्यांनी दोन नंबर दिले आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून त्यांचा फोन सतत खणखणत आहे.
त्यांच्या पत्नीचे सात वर्षापूर्वी निधन झाले. त्यांना एक मुलगी, जावई, नात आहे. त्यांच्या मुलीस पुनर्विवाहाबाबत कोणताही आक्षेप नसल्याचा दावा ज्येष्ठ वराने केला आहे. गेल्या रविवारी त्यांची मुलगी आणि जावई विवाहोइच्छुक सासऱ्याकडे आले आणि विवाहसंदर्भात चर्चा केली.
यावेळी वृद्धाश्रमाचा पर्याय आपण का निवडत नाहीत, असे विचारणा केली असता त्यांनी आपल्याला वृद्धाश्रमातील नियम आणि अटी जाचक वाटतात असे सांगितले. यापूर्वीच आयुष्य मनसोक्तपणे जगलेले असताना आता बंधने नको आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी आपली देखभाल करावी, एवढीच आपली इच्छा असल्याचे ते म्हणतात. एकाकीपणा घालवण्यासाठी आपण पुनर्विवाहाचा विचार केल्याचे ते म्हणतात. इच्छुक प्रस्तावाची ते स्वत: पडताळणी करणार असून विवाहामागे प्रॉपर्टी आणि पैसे मिळवण्याचा तर हेतू नाही ना, याची ते खातरजमा करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App