विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाईचे सावट गडद होताच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फणा काढला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना 11 मुद्यांचे पत्र लिहून संजय राऊत यांनी अनेक केंद्रीय तपास संस्थांवर ते “क्रिमिनल सिंडिकेट” चालवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. As soon as the action of ED got dark, Sanjay Raut removed Fana; Accusation of “Criminal Syndicate” by writing a letter to the Vice President !!
संजय राऊत यांनी या पत्रात एका पाठोपाठ एक आरोपांची सरबत्ती केली आहे. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार पाडण्यासाठी आपल्याला आणि सरकारमधील दोन मंत्र्यांना ऑफर देण्यात आली होती. परंतु ती आम्ही नाकारली आणि म्हणूनच आमच्या विरोधात ईडी सारख्या केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशी आणि तपासाचा ससेमिरा लावण्यात आला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. इतकेच काय तर उपराष्ट्रपतींना पाठवलेले पत्र हे फक्त माहितीसाठी आहे. ट्रेलर अजून यायचा आहे. सिनेमा तर त्या पुढचा भाग आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्ती बांधकाम व्यवसायिक प्रवीण राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यांना अटक केली त्यांच्या संपत्तीचा काही भाग जप्त केला. तेव्हा संजय राऊत हे गोव्यात होते. मला मुंबईला येउद्यात मग काय करायचे ते पाहतो, असे तेव्हा म्हणाले होते. आता मुंबईतून सामनाच्या लेटरहेडवर संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांना पत्र लिहिले आहे.
सत्यमेव जयते.. pic.twitter.com/ImdX7wPuYa — Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2022
सत्यमेव जयते.. pic.twitter.com/ImdX7wPuYa
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2022
केंद्रीय तपास संस्था वेगवेगळ्या गैरव्यवहारांमध्ये स्वत:च गुंतल्या आहेत. खासदार, आमदार, मंत्री यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना ते त्रास देत आहेत. इतकेच काय पण त्यांच्या नातेवाईकांना देखील केंद्रीय तपास संस्था सोडत नाहीत. केंद्र सरकार मुळे देशात “जाहीर आणीबाणी” पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र उपराष्ट्रपतींना पाठवल्यानंतर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांचे मला फोन आले. आपण पत्रात योग्य मुद्दे मांडले, असे त्यांनी मला सांगितले असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
या पत्राच्या सीसी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे तसेच अन्य राजकीय पक्षांच्या संसदीय गटनेत्यांना पाठविल्या आहेत. परंतु यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव नाही. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या पत्राची सीसी पाठवलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App