“महिला म्हणून मला मॅचिंग मास्क हवं असतं, सौंदर्य हा माझा अधिकार ” – महापौर किशोरी पेडणेकर


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत उद्भवणाऱ्या आव्हानांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वांनी मास्क वापरल्यास त्रास कमी होईल असं सांगितलं “As a woman I want a matching mask, beauty is my right” – Mayor Kishori Pednekar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोनासाठी बेड्स वाढवणार असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत उद्भवणाऱ्या आव्हानांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वांनी मास्क वापरल्यास त्रास कमी होईल असं सांगितलं.



यावेळी पत्रकारांनी पेडणेकर यांना डिझायनर मास्क वापरासंबंधीत प्रश्न विचारला असता, यावेळी पेडणेकर यांनी स्वत: डिझायनर मास्क लावलेला होता.त्यांनी माझा मास्क थ्री लेअर आहेच. तसंच महिला म्हणून काही सुप्त गुण असतात.महिला म्हणून मला मॅचिंग हवं असतं, महिला म्हणून सौंदर्य हा माझा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांनी डिझायनर मास्कचा फायदा नसल्याचं म्हटलं होतं.

तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत मास्कच्या वापराबद्दल माहिती देताना डिझायनर मास्क फारसे फायद्याचं नसून, N – 95 मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता.

“As a woman I want a matching mask, beauty is my right” – Mayor Kishori Pednekar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात