Aryan Khan Drug Case : आर्यन खानच्या बचावासाठी शिवसेना नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव, एनसीबीच्या भूमिकेवरही केले प्रश्न उपस्थित

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या बचावासाठी शिवसेनेचे नेत्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खान मुंबई क्रूझवर ड्रग्जप्रकरणी पकडला गेला होता. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यन खानच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आरोपींच्या मूलभूत अधिकारांचा हवाला देत आर्यनला दिलासा देण्याचे म्हटले आहे. आर्यन खानच्या जामिनावर 20 ऑक्टोबरला निर्णय होणार आहे. Aryan Drug Case Shiv Sena leader Kishor Tiwari reached Supreme Court to save Aryan Khan, questions role of NCB


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या बचावासाठी शिवसेनेचे नेत्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खान मुंबई क्रूझवर ड्रग्जप्रकरणी पकडला गेला होता. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यन खानच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आरोपींच्या मूलभूत अधिकारांचा हवाला देत आर्यनला दिलासा देण्याचे म्हटले आहे. आर्यन खानच्या जामिनावर 20 ऑक्टोबरला निर्णय होणार आहे.

शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडे याप्रकरणी स्वत: लक्ष देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांचे सतत उल्लंघन होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शिवसेना नेत्याने आपल्या याचिकेत पुढे लिहिले आहे की, या ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिकदेखील NCBच्या भूमिकेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.



अशी झाली होती आर्यनला अटक

आर्यन खानवर ड्रग्ज घेणे -विक्रीशी संबंधित एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचा आरोप आहे. NCBने आरोप केला आहे की, अरबाजकडून 6mg अंमली पदार्थ सापडले आहे. आर्यनला अटक केल्यानंतर, एनसीबीने त्याचा फोनही जप्त केला आणि आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग रॅकेटचा भाग आहे का हे पाहण्यासाठी त्याच्या सर्व चॅट्स तपासणे सुरू केले. एनसीबीचा असा विश्वास आहे की, आर्यन खान हार्ड ड्रग्जमध्ये डील करतो आणि काहींना त्याने पैसेही दिले, जे त्याच्या फोनवरून उघड झाले आहे.

आर्यनच्या जामीन अर्जावर 20 ऑक्टोबरला निर्णय

आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या वकिलांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर सुनावणी झाली आहे. न्यायालय 20 ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहे. याप्रकरणी आर्यन खान, मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन खानबद्दल बोलताना, त्याच्यावर ड्रग्ज घेण्याचा आणि मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप आहे.

Aryan Drug Case Shiv Sena leader Kishor Tiwari reached Supreme Court to save Aryan Khan, questions role of NCB

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात