पूरग्रस्त विदर्भात लष्कर धावले मदतीला, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे वाचवले प्राण


प्रतिनिधी

नागपूर : एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह आता विदर्भात पूरग्रस्तांच्या मदत कार्यात लष्करही उतरले आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि पुरात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी विदर्भात सैन्य तैनात करण्यात आले आहे.Army’s help in Vidarbha flood relief work, lives of citizens saved in Chandrapur district

मेजर भुवन शाह यांच्या नेतृत्वाखाली गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी येथील सैन्य दल आवश्यक उपकरणांसह पूरग्रस्त भागात पोहोचले. २० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील माणगाव या गावात लष्कराचे बचाव कार्य सुरू झाले. पुरामुळे गाव पूर्णपणे इतर भागापासून तुटले आहे. लष्करी बचाव पथक, नागरी अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या सहकार्याने सतत कार्यरत आहे.



२० जुलै पर्यंत ११३ गावकऱ्यांची सुरक्षित ठिकाणी सुटका करण्यात आली. पूरस्थितीनुसार पुढील गरज भासल्यास प्रतिसाद देण्यासाठी कामठी कॅन्टोन्मेंट येथे एक टीम तयार ठेवण्यात आली आहे. ब्रिगेडियर दीपक शर्मा यांनी सैन्याने केलेल्या ऑपरेशन्सचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळांना भेट दिली.

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संततधार आणि मुसळधार पाऊस आणि सिंचन प्रकल्पांमधून पाणी सोडल्याने नागपूर उपविभागातील चंद्रपूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या या भागात कार्यरत होत्या. त्यांच्या मदतीला आता लष्करही तैनात केले आहे.

Army’s help in Vidarbha flood relief work, lives of citizens saved in Chandrapur district

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात