करा ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अर्ज ! मिळवा ४० टक्के अनुदान


प्रती हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून ४० टक्‍क्‍यांप्रमाणे एक लाख ६० हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान तीन वर्षात ६० : २० : २० या प्रमाणात देण्यात येते.Apply for Dragon Fruit Planting! Get 40% subsidy


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : दिवसेंदिवस ड्रॅगन फ्रुट ला भारतीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे हि बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्र शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.२०२१-२२ या वर्षापासून कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी ४० टक्के अनुदान देण्यात येत आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. या फळाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून, पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.



प्रती हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून ४० टक्‍क्‍यांप्रमाणे एक लाख ६० हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान तीन वर्षात ६० : २० : २० या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी ७५ टक्के व तिसऱ्या वर्षी ९० टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

अनुदानाचा लाभ घेऊन ड्रॅगन फ्रुट लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल च्या महाडीबीटी mahadbtmahait.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत.

ड्रॅगन फ्रूटचे प्रकार:

पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ.
लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ.
पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ.

हे आहेत फायदे

* वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
* म्हातारपणाचा प्रभाव कमी होतो.
* अस्थमाशी लढण्यास मदत करते.
* व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत आहे.
* मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.
* कोलेस्टेरॉल कमी करण्यास सहायक आहे.
* यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते.
* अर्थेरायटिसच्या त्रासापासून आराम मिळतो.
* हृदयरोग असणारांनी हे फळ खावे.

Apply for Dragon Fruit Planting! Get 40% subsidy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात