विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे अर्ज काही अपरिहार्य कारणामुळे आरटीई पोर्टलवर अर्ज १ फेब्रुवारी ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी पासून भरता येतील.Applications for RTE 25% admission process on From 16th February School Education Minister Pvt. Information of Varsha Gaikwad
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. १ फेब्रुवारी पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App