Sachin Vaze Dismissed From Police Service : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे यांना अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सचिन वाझे यांना मुंबई पोलिसांनी बरखास्त केले. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात एनआयए चौकशी करत आहे. एनआयएने 13 मार्च रोजी सचिन वाझे यांना अटक केली होती. Antilia Bomb case and Mansukh Hiren Murder Case Accused Sachin Vaze Dismissed From Police Service Today
वृत्तसंस्था
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे यांना अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सचिन वाझे यांना मुंबई पोलिसांनी बरखास्त केले. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात एनआयए चौकशी करत आहे. एनआयएने 13 मार्च रोजी सचिन वाझे यांना अटक केली होती.
मनसुख हिरेन यांच्या तोंडात कोंबलेला रुमाल सचिन वाझेने कळ्व्यातून केला होता खरेदी
सचिन वाझे लादेन नाही? दोघा गुंडांना खोट्या चकमकीत मारण्याचा आखला होता प्लॅन
बरखास्त होण्यापूर्वी सचिन वाझे हे मुंबई पोलिसांतील एक शक्तिशाली अधिकारी होते. त्यांची पहिली पोस्टिंग 1990 मध्ये गडचिरोली येथे उपनिरीक्षक म्हणून झाली होती. परंतु काही काळातच त्यांनी करिअरमधील यशोशिखराला गवसणी घातली आणि ते मुंबईतील बडे पोलीस अधिकारी म्हणून उदयास आले. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे सचिन वाझे यांच्या कारकिर्दीत 63 गुन्हेगारांचे एन्काउंटर झालेी. 2002 मध्ये घाटकोपर स्फोटांमागचा सूत्रधार असलेला आरोपी ख्वाजा युनूसचा कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर सचिन वाझे व इतर तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. सचिन वाझे यांच्यावर खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा आरोप होता.
आधी अँटिलियाबाहेर बॉम्ब आणि मग बनावट चकमक करणार होते सचिन वाझे?, NIAच्या तपासात एन्काउंटर अँगल
NIA Antilia Case : पोलीस अधिकारी रियाझ काझींना अटक, अँटिलया प्रकरणात सचिन वाझेंना मदत केल्याचा आरोप
त्यांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आले होते. परंतु, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता, कारण चौकशी सुरू होती. 2008 मध्ये ते शिवसेनेत दाखल झाले. येथे ते पक्षाचे प्रवक्ते झाले. एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सचिन वाझे यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही.
Antilia Bomb case and Mansukh Hiren Murder Case Accused Sachin Vaze Dismissed From Police Service Today
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App