ठाकरे सरकारचे आणखी एक सुडाचे राजकारण, माजी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण पुन्हा उकरून काढत कारवाईची तयारी


विशेष प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आपल्या सुडाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. माजी खासदार मोहन डेलकर प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे. दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.Another revenge politics of the Thackeray government, former MP Mohan Delkar’s suicide case is being re-examined and action is being prepared

खासदार मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेली या लोकसभा मतदारसंघातून ७ वेळा निवडून आले. त्यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पाटील यांचे नाव मुख्य आरोपींमध्ये आहे. खेडा पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या निकटचे समजले जातात



मुंबई पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने प्रफुल्ल खेडा पाटील यांच्यासह इतरही सात आरोपींचा सलग दोन दिवस जबाब लिहून घेतला आहे, त्यामुळे तपासाला अधिक वेग मिळाला आहे. खासदार मोहन डेलकर यांनी त्यांची आत्महत्या ही त्यांच्या मतदारसंघात न करता महाराष्ट्रातील मुंबईत केली.

महाराष्ट्र्रात बिगर भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे व तेच मला किमान माझ्या आत्महत्येनंतर न्याय देईल, असा त्याचा ठाम विश्वास होता. हे त्यांनी आत्महत्येपूर्वी गुजराथी भाषेत लिहिलेल्या १५ पानी सुसाईड नोटमधून स्पष्ट होते. त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मुंबई पोलिसांच्या अधिकाराखाली विशेष पथक नेमले होते. मात्र त्यांची प्रक्रिया जवळपास थांबल्यासारखीच होती.

प्रफुल्ल खेडा पटेल हे गुजरातचे राज्य गृहमंत्री होते. सोहराबुद्दीन केसमध्ये अटक झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अमित शहा याना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर लगेचच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रफुल्ल खेडा – पटेल यांची गृहमंत्री पदी नियुक्ती केली होती.

Another revenge politics of the Thackeray government, former MP Mohan Delkar’s suicide case is being re-examined and action is being prepared

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात