Sanjay Raut – Nawab Malik : गादी पलंग उशी सावजीचा रस्सा खाऊन ताणून देशी!!; डॉ. अनिल बोंडे फॉर्मात!!


विशेष प्रतिनिधी

नागपूर : सध्या महाराष्ट्राच्या राजकारण केंद्रीय तपास संस्था, ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांचा बराच बोलबाला असताना सगळीकडे घोटाळे, महाघोटाळे यांची चर्चा सुरू आहे. Sanjay Raut – Nawab Malik says anil bonde

या चर्चेतून पेन ड्राईव्ह, पुरावे सीडी अशी भाषा ही वापरण्यात येत आहे. पण या भाषेत आता पलंग, उशी, सावजीचा रस्सा या शब्दांचा समावेश झाला आहे. भाजपचे माजी कृषिमंत्री डॉक्टर अनिल बोंडे सध्या फॉर्मात आले आहेत.

नबाब मलिक यांना तुरुंगात गादी उशी आणि खुर्ची वापरण्याची परवानगी दिल्यानंतर डॉक्टर अनिल बोंडे यांनी काल नवाब मलिक यांना तुरुंगात वापरण्यासाठी खास पलंग गादी आणि उशी पाठवून दिली.आज अनिल बोंडे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मेहुण्याच्या संपत्तीवर टाच आणल्यामुळे मातोश्रीच्या साऱ्या दरवाजे खिडक्या हलू लागले आहेत. नागपुरात सावजीचा रस्ता चांगला झोंबतो आहे. विशेषतः सकाळी उठल्यावर हात धुताना तो रस्ता चांगला तो रस्ता चांगलाच झोंबतो, अशा तिखट शब्दांमध्ये अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. केलेली पापे रात्रीची झोप घेऊ देत नाहीत, असा टोमणाही अनिल बोंडे यांनी लगावला आहे.

संजय राऊत सध्या शिवसंपर्क अभियानासाठी तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सावजीचा रस्सा खाऊ, असे त्यांनी म्हटले आहे. याच मुद्द्यावरून अनिल बोंडे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

मध्यंतरी महाराष्ट्राच्या राजकारणात म्याव म्याव गाजले. पहचान कौनचा कोंबडा गाजला. आता पलंग गादी पलंग उशी आणि सावजीचा रस्सा गाजतो आहे.

sanjay Raut – Nawab Malik says anil bonde

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर