अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावाचून पवारांना पर्यायच नाही उरला!!; १०० कोटींच्या लपेट्यात देशमुख सीबीआयपुढे कोणाची नावे घेणार??, राष्ट्रवादीच्या अतिवरिष्ठ गोटात चिंता!!

विनायक ढेरे 

मुंबई – विरोधक नुसतेच आरोप करताहेत, अधिकृत तक्रारच दाखल नाही याच्या सबबीआड दडून राहिलेल्या गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा ज्येष्ठ नेते शरद पवारांना अखेर घ्यावा लागला…पण त्याचबरोबर अनिल देशमुख राजीनामा देऊन मोकळे झाल्यावर सीबीआय चौकशीत नेमके काय सांगतात, कोणा – कोणाची नावे घेतात… १०० कोटींच्या लपेट्यात आणखी कोण – कोण येणार…, याची भीती राष्ट्रवादीच्या “अतिवरिष्ठ” गोटात पसरली आहे. anil deshmukh`s exit is inevitable for sharad pawar, now anil deshmukh will “encircul” whom?, NCP in trouble

आज सकाळी सीबीआय चौकशी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह लावल्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याशिवाय त्यांच्यापुढेही पर्याय उरला नाही.शरद पवार सध्या पोटदुखीच्या आजारपणाची विश्रांती घेत आहेत. अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणीखोरीचा आरोप गंभीर असल्याचे ठरवून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे नुसतेच आरोप किंवा अधिकृत तक्रार नाही, या सबबींच्या आड दडण्याची मूभाच त्यांना उरली नव्हती. अशा स्थितीत शरद पवार यांच्यापुढे देखील अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यावाचून पर्याय उरला.

अनिल देशमुख गृहमंत्रीपदावर राहुन सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेला समोरे जाणे राष्ट्रवादीच्या प्रतिमेलाही तडा देणारे ठरले असते. शिवाय या प्रकरणात सचिन वाझेंचे नाव असल्याने शिवसेनेचाही आता अनिल देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव आला होता.

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यायला लागला. पण विवाहबाह्य संबंध प्रकरणात नाव येऊनही धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी वाचविले. आणि आता १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात अनिल देशमुखांचे नाव येऊन त्यांना आत्तापर्यंत पवारांनी राजकीय आश्रय दिला. पण आता राज्याच्या यंत्रणेकडून नव्हे, तर थेट सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणेकडून १५ दिवसांच्या आत तपास करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देखील अनिल देशमुखांना वाचविणे पवारांसाठी अवघड ठरले.

यातून अनिल देशमुख सीबीआयपुढे काय बोलतील, याची भीती पवारांना वाटत असल्याचा संशय देखील वाढीस लागला आहे. आधीच पवारांची प्रतिमा ही “भ्रष्टाचार करून नामानिराळे राहणारे नेते” म्हणून महाराष्ट्रात झाली आहे. त्यात अनिल देशमुखांना सीबीआयची चौकशी दारात येऊन ठेपल्यानंतरही त्यांना वाचवत रहिल्याने यातून पवारांची प्रतिमा आणखी डागाळली, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पण त्याचबरोबर अनिल देशमुख गृहमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर सीबीआयच्या चौकशीत काय बोलणार…, कोणा – कोणाची नावे घेणार याची चिंता राष्ट्रवादीच्या नेत्यांना ग्रासायला लागली आहे.

anil deshmukh`s exit is inevitable for sharad pawar, now anil deshmukh will “encircul” whom?, NCP in trouble

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*