प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 2100 मार्चमध्येच मुंबई पोलिसांचा बदली घोटाळा बाहेर काढला होता. या घोटाळ्याच्या मुद्द्यावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आज जेलमध्ये आहेत. केस सीबीआयकडे आहे आणि मुंबई पोलिसांनी आता देवेंद्र फडणवीस यांना संबंधित बदली घोटाळ्याची माहिती तुमच्याकडे माहिती कशी आली?, हा गोपनीय कायद्याचा भंग आहे, अशी विचारणा करत नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी 11.00 वाजता बीकेसीच्या सायबर पोलिस ठाण्यामध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.Anil Deshmukh in jail in transfer scam-devendrafadnavis
शनिवारी पत्रकार परिषद घेत फडणवीस म्हणाले, की मी मार्च 2021 राज्यात झालेल्या बदली घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी उघडकीस आणला होता. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केली. ही माहिती मी बाहेर कुठे बोललो नाही. पण राज्यातील मंत्र्यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती बाहेर दिली. त्या वेळचे गृहमंत्री आज जेलमध्ये आहेत. केस सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून महा विकास आघाडी सरकारला सीबीआयकडे सोपवावी लागली आहे. पण माझ्याकडे बदली घोटाळ्यातले पुरावे आहेत. मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे कायद्यानुसारच माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणे मला बंधनकारक नाही. त्यामुळे मला माहितीचा सोर्स विचारून पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी मी बीकेसीच्या सायबर ठाण्यात जाणार आहे आणि पोलिसांना सहकार्य करणार आहे असे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले यांनी स्पष्ट केले.
ED ANIL DESHMUKH: अनिल देशमुखांच्या वसुली प्रकरणात ईडीने नोंदवला पुण्याच्या डीसीपींचा जबाब …
– अहवाल सहा महिने पडून
या संदर्भातील अहवाल सहा महिने सरकारकडे पडला होता. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. मग सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर? हा माझा सवाल आहे. राज्य सरकारने केलेल्या षड्यंत्रचा भांडाफोड मी परवा केला म्हणून त्यांना काही सुचत नसल्याने त्यांनी मला ही नोटीस दिली आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
– केंद्रीय गृहसचिवांकडे माहिती दिली
दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केल्याने न्यायालयाने त्याचे गांभीर्य ओळखून सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. ऑफिशियल सिक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मला काल सीआरपीएफ नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली. उद्या 11 वाजता बीकेसी सायबर ठाण्यात बोलावले आहे. मी तेथे जाऊन त्यांना उत्तर देणार आहे असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App