राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.AMRUTA FADNAVIS: The Nawab is also exposed! Are you a man Then target Devendraji directly – don’t bring me in: Amrita Fadnavis
विशेष प्रतिनिधी
मुंबई: नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा. मला मध्ये आणू नका, असा घणाघाती हल्ला अमृता फडणवीस यांनी आज नवाब मलिक यांच्यावर नाव न घेता केला.
अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला. राजकीय आरोप-प्रत्यारोपात स्त्रियांनाही ओढले जात आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असा सवाल अमृता फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी हे टीकास्त्र सोडलं. ज्या स्त्रिया सरळ मार्गाने जात आहेत त्यांना डिवचू नका, असं मी दोन दिवसांपूर्वीच म्हटलं होतं.
देवेंद्रजींना टार्गेट करायला तेच आज माझ्याबाबतीत केलं गेलं. तुम्ही मर्द आहात ना? डायरेक्ट त्यांना टार्गेट करा. मला मध्ये नका आणू. एक समाज सेविका म्हणून मी माझे विचार प्रकट करत असते आणि करत राहील. मला कोणीही थांबवू शकत नाही, असं अमृता म्हणाल्या.
बेनकाब तो नवाब भी होता है….
देवेंद्र फडणवीस ड्रग्ज पेडलरच्या पाठीशी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या जावयाला विचारावं कोण कुणाच्या पाठिशी आहे. बेनकाब नवाब भी होता है और वो जरुर होगा. फक्त वेळ यावी लागते,
असं सूचक विधान त्यांनी केलं. मी ट्विट केलं. काही लोकांना काहीच सूचत नाही, त्याबद्दल मी ट्विट केलं आहे. जेव्हा एखाद्या माणसात निगेटिव्हीटी आलेली असती तेव्हा तो खराबच विचार करतो. बाकी काही नाही, असा चिमटाही त्यांनी काढलाय.
राणाचं नाव काढलं तर चुकीचं काय?
जयदीप राणाचं नाव गाण्यातून वगळण्यात आलं आहे, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना माहीत नसेल तो ड्रग्जमध्ये आहे म्हणून. रिव्हर मार्चलाही माहीत नसेल. म्हणून त्याचं नाव कट केलं असेल. तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं.
त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर त्यांनी नाव काढलं तर काय चुकीचं आहे?, असा सवालही त्यांनी केला. मलिक यांनी जाणीवपूर्वक आरोप केले. आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते काय एक्सपोज करणार? आमच्याकडे जमीनी नाही, साखर कारखाने नाही, त्यामुळे ते आरोप करणारच. पण आम्ही कुणाला घाबरत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App