चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?, अमृता फडणवीसांचा नवाब मलिक यांच्यावर निशाणा


वृत्तसंस्था

मुंबई : चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?, विनाशकले विपरीत बुद्धी, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis Answer on Minister Nawab Malik Allegation about drugs

नवाब मलिकांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट करून ड्रग पेडलर आणि भाजपचे नाते असल्याकॅगे ट्विट करून खळबळ उडवून दिली होती.त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट करून मलिकांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. मुंबई क्रुझवर केलेल्या कारवाईनंतर राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मलिकांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आता हे प्रकरण भाजपाशी जोडले गेले आहे.नवाब मलिकांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला. त्यानंतर भाजपाचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले. आता यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलंय की, चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते. असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक काय म्हणाले?

ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणं आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis Answer on Minister Nawab Malik Allegation about drugs

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!