अमरावती : राणा दाम्पत्य झाले कोरोना पॉझिटिव्ह


स्वाभिमान पक्षाचा वर्धापनदिन हा १२ जानेवारीला मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता.दरम्यान यावेळी चांगलीच गर्दी झाली होती.Amravati: Rana couple Corona positive


विशेष प्रतिनिधी

अमरावती : अमरावती जिल्ह्यात सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अशातच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असलेले राणा दांपत्य यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.सध्या ते मुंबई येथील निवासस्थानी असून, अमरावतीमधील युवा स्वाभिमानचे पदाधिकारी तसेच संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन राणा दाम्पत्याने केले आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपासून नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा हे विविध कार्यक्रमात सहभागी होत होते.दरम्यान युवा स्वाभिमान पक्षाचा वर्धापनदिन हा १२ जानेवारीला मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता.दरम्यान यावेळी चांगलीच गर्दी झाली होती.

यासोबतच राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता.तसेच या सोहळ्याच्या निमित्तानेसुद्धा सलग तीन दिवस लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.त्यामुळे संपर्कात आल्याने राणा दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.

Amravati : Rana couple Corona positive

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था