Raj Thackeray : मनसेच्या संभाजीनगर जाहीर सभेला पर्यायी जागा??; गरवारे स्टेडियमचा पोलिसांचा प्रस्ताव


प्रतिनिधी

संभाजीनगर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात आवाज टाकल्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या खळबळीतून त्यांच्या संभाजीनगरच्या जाहीर सभेला विरोध होत आहे. विविध संघटनांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नये असे अर्ज पोलिसांकडे केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेचे ठिकाण बदलावे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाऐवजी गरवारे स्टेडियम मध्ये सभा घ्यावी अशी सूचना पोलिसांनी केल्याचे समजते. Alternative place for MNS’s Sambhajinagar public meeting

राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरचे अजानचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, अशा आशयाचे वक्तव्य केले. १ मे रोजी संभाजीनगरमधील मनसेच्या सभेवरून वाद सुरू आहे. राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी देऊ नये असे म्हणत राजकीय संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. मनसे मात्र ही सभा घेण्यावर ठाम आहे.

येत्या १ मे रोजी मनसेची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानात घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र पोलिसांनी पर्यायी जागेचा प्रस्ताव मनसेसमोर ठेवल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांची सभा गरवारे स्टेडियमवर घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र मनसे ठरलेल्या ठिकाणीच म्हणजे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्यास ठाम आहे. तसेच मनसेकडून या सभेला उपस्थित राहण्यासाठी सोशल मीडियावर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तर मनसे पदाधिकारी या सभेसाठी सज्ज असून त्यांची तयारी सुरू आहे.

वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला तीव्र विरोध केल्याची माहिती मिळतेय. राज ठाकरे यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, असे पत्र पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी घोषणा केलेल्या १ तारखेच्या सभेला परवानगी मिळते का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

या संघटनांचा राज ठाकरेंच्या सभेला विरोध

1. वंचित बहुजन आघाडी .
2. प्रहार जनशक्ती संघटना
3. मौलांना आझाद विचार मंच
4. गब्बर ॲक्शन संघटना
5.ऑल इंडिया पँथर सेना
6. मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल

Alternative place for MNS’s Sambhajinagar public meeting

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात