सीआरपीएफच्या सशस्त्र ताफ्यासह सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा घातला. सलग साडेनऊ तास चाैकशी करण्यात आली. Along with CRPF’s armed contingent, Former home minister Anil Deshmukh house again hit by the ED, with a nine-and-a-half hour enquiry
विशेष प्रतिनिधी
नागपूर : सीआरपीएफच्या सशस्त्र ताफ्यासह सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा घातला. सलग साडेनऊ तास चाैकशी करण्यात आली.
ईडीने महिनाभरात दुसऱ्यांदा नागपुरात येऊन देशमुख यांची चौकशी केली आहे. ईडीचे पथक मुंबईहून गुरूवारी रात्री नागपुरात पोहोचले आणि शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजता देशमुख यांच्या निवासस्थानी छापा घातला. या पथकाने स्वतासोबत सीआरपीएफचाही ताफा आणला होता. त्यात सशस्त्र महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यानंतर स्थानिक वरिष्ठांशी संपर्क करून पोलीस बंदोबस्त मागवून घेण्यात आला.
अनिल देशमुख यांच्या पत्नी, मुलगा सलील आणि सून तसेच नातवंड, घरातील कर्मचारी आणि ऑपरेटर असे १० जण आतमध्ये होते. त्यांना एकत्र बसवून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चाैकशी सुरू केली. कागदपत्रे, कॉम्प्युटर, मोबाईल आणि लॅपटॉपही तपासले. सलग साडेनऊ तास चाैकशी केल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता एका महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक देशमुखांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. त्यांनी आपल्या सोबत कागदपत्रे नेल्याचे सांगितले जाते.
देशमुख नागपुरात नसल्याचे माहित असूनही ईडी नागपुरात धडकली. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांचीच चाैकशी करायची असावी, असा तर्क लावला जात आहे.
महिन्याला १००कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपावरून आधी सीबीआय आणि आता महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीच्या पथकाने देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तियांची चाैकशी केली. राजकीय सूडबुद्धीने ही चौकशी सुरू झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार, महिला नेत्या नूतन रेवतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशमुखांच्या निवासस्थानासमोर पोहचून भाजपा आणि केंद्र सरकारच्या ईशाऱ्यावरून चाैकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App