वृत्तसंस्था
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आता जात लपवणे यावरून आरोप सुरू झाले आहेत. त्यांनी या आरोपांचा इन्कार केला असला तरी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक रोज तोच आरोप करत आहेत. समीर वानखेडे मुस्लीम होते. त्यांचा निकाह झाला होता, असा आरोप नवाब मलिक वारंवार करत आहेत. Allegations from Sameer Wankhede’s caste; With the support of Ramdas Athavale Wankhed
मात्र या मुद्द्यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभे राहिले असून वानखेडे यांना जातीच्या मुद्द्यावरून नवाब मलिक बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या पद्धतीचे आरोप करणे थांबविले पाहिजे, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली आहे.
समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे या दोघांनी आज रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यानंतर आठवले यांनी क्रांती रेडकर आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी समीर वानखेडे यांना जातीवरून बदनाम करता कामा नये, असा इशारा आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.
त्याच वेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी देखील समीर वानखेडे यांची पाठराखण केली आहे. समीर वानखेडे हे मागासवर्गीय आहेत. त्यांनी स्वतः धर्मांतर केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते धर्मांतरीत म्हणता येणार नाहीत, असे अरुण हलदार यांनी म्हटले आहे.
मात्र महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आता समीर वानखेडे यांच्या जातीच्या वादामध्ये उङी घेतली असून जर कोणी समीर वानखेडे यांच्या मागासवर्गीय असणाऱ्या असण्याच्या सर्टीफिकीट विषयी तक्रार केली तर राज्य सरकार त्याचा तपास करु शकते, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. समीर वानखेडे मुस्लिम असून देखील त्यांनी सरकारी नोकरीत एका मागासवर्गीयांची जागा अडवली आहे, असा आरोप नबाब मलिक यांनी अनेकदा केला आहे. या रामदास आठवले आणि अरुण हलदर हे दोन नेते समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभे असलेले दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App