पुढच्या वर्षीच्या सर्व गणेशमुर्ती बनणार शाडूच्या, पर्यावरणपूरक उत्सव; प्लास्टर ऑफ पॅरिस हद्दपार


वृत्तसंस्था

मुंबई : देशभरात पुढच्या वर्षी सर्व गणेशमूर्ती या शाडूच्या किंवा पर्यावरण पूरक पदार्थांची तयार होणार आहेत. कारण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजाणीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस आपोआप हद्दपार होणार आहे. All next year’s Ganesh idols will be of Shadu’s, Eco-friendly celebrations; Plaster of Paris deportation

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार पर्यावरणपूरक मुर्ती नसल्यास मूर्तिकाराने पालिकेच्या तिजोरीत जमा केलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे. तसेच दोन वर्षांसाठी मुर्तिकाराची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ताजिया इत्यादी सण, उत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, यासाठी मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची समन्वय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने पालिकेने यावर्षीच २०२२ च्या उत्सवांचे नियोजन करण्यास सुरुवात केली . २०२२ मधील गणेशोत्सवापासून मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. मंडळाने मूर्तिकार-कलाकार, गणेशोत्सव मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींसाठी स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच मुर्ती विसर्जनाबाबत स्वतंत्र सूचनांचा यात समावेश आहे. राज्य स्तरावरील प्रदूषण नियंत्रण मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

सुधारित मार्गदर्शक सूचना

  • मूर्ती केवळ नैसर्गिक, जैविकदृष्टय़ा विघटनशील आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार करावी
  • सजावट पानाफुलांची असावी. प्लास्टिक नसावे
  • मुर्तीचे रंग हे पर्यावरणपूरक असावेत
  • मूर्तिकारांची नोंदणी असणे आवश्यक.
  • पूजेदरम्यान फुले, पत्री, वस्त्र आदींचा वापर करावा
  • समुद्रात ओहोटी रेषा व भरती रेषा यातच विसर्जन
  • घरगुती मूर्ती विसर्जन हे घरी करण्यास प्राधान्य.

All next year’s Ganesh idols will be of Shadu’s, Eco-friendly celebrations; Plaster of Paris deportation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”