अजित पवारांना पुन्हा एकदा धक्का बसला , मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरावर ईडीची छापेमारी , चौकशीच नेमक कारण काय ?


दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.Ajit Pawar was shocked once again, ED raided the house of his brotherJagdish Kadam.


विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी मागील काही दिवसात आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना घडली असतानाच आता पुन्हा एकदा अजितदादांना धक्का बसला आहे. अजितदादांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.कोण आहेत जगदीश कदम

जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. त्यामुळे तेथे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कदम हे मुंबईत आहेत. घरी ईडीने धाड मारल्याचं कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे जायला निघाले आहेत.

दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासादेखील कारखान्याकडून करण्यात आला होता. तरीही जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Ajit Pawar was shocked once again, ED raided the house of his brother Jagdish Kadam.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था