किरण गोसावीचा अटकेआधीचा व्हिडिओ आला समोर! म्हणाला , मी मराठी माणूस….


किरण गोसावीला ताब्यात घेण्यापूर्वीचा त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं प्रभाकर साईलनं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.Video before Kiran Gosavi’s arrest came to light! Said, I am a Marathi man ….


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी याला महाराष्ट्रातील पुणे येथून अटक करण्यात आली आहे.फसवणूक प्रकरणी गोसावी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

किरण गोसावीला ताब्यात घेण्यापूर्वीचा त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं प्रभाकर साईलनं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘साईल हा खोटं बोलत आहे. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन भावांना या प्रकरणात पैसे मिळाले आहेत. पोलिसांनी त्यांचे सीडीआर तपासावेत. त्याला कोणाच्या आणि काय ऑफर आल्या होत्या हे समोर येईल.पुढे गोसावी म्हणाले की , माझेही फोन रेकॉर्ड तपासावेत. क्रूझवरील कारवाईनंतर पैशाच्या देवाणघेवाणीबाबत माझं त्याच्याशी कधीच बोलणं झालेलं नाही. त्याच्याशी माझं झालेलं संभाषण आधीचं आहे. माझा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्या संदर्भात मी त्याच्याशी याआधी बोललो आहे. आर्यन खान प्रकरणी माझं त्याच्याशी अजिबात बोलणं झालेलं नाही.

मी एक मराठी माणूस आहे. राज्यातील विरोधी पक्षानं किंवा सत्ताधारी पक्षातील कोणीतरी माझ्या मागे उभं राहायला हवं. मी केलेल्या मागण्यांची चौकशी व्हावी, यासाठी पोलिसांकडं पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा त्यानं यावेळी व्यक्त केली आहे.

Video before Kiran Gosavi’s arrest came to light! Said, I am a Marathi man ….

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती