
विशेष प्रतिनिधी
बारामती : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर वसुली हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहे.Ajit Pawar says has he become Deputy Chief Minister for recovery? Netkari said you had appointed Home Minister for that!
आज याच शब्दाचा वापर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आणि नेटकºयांनी त्यांना चांगलेच सुनावले. वसुली करायला उपमुख्यमंत्री बनलोय का? असा सवाल अजित पवार यांनी केला आणि नेटकरी म्हणाले तुम्ही त्यासाठी गृहमंत्री नेमले होते.
बारामती येथे एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, वेडवाकडी काम करू नका, वेडे वाकडे धंदे करू नका, वाईट सवयी असलेल्या लोकांच्या नादी लागू नका, हे मला स्पष्ट सांगायचंय. नाहीतर दादा, यांनी माझी पैसे बुडवले, असं सांगत येता.
मी काय वसुली करण्यासाठी उपमुख्यमंत्री बनलोय का? चुकीचं कुणी वागायचं नाही, कुठे बेकायदेशीर अवैध व्यवसाय, कुठे सावकारीचा धंदा, कुठे शेकड्याने पैसाचा धंदा असेल ना त्यांना मी सोडणार, कितीही मोठ्या बापाचा असला तरी अजिबात सोडणार नाही त्याला मोका लावला जाईल.
काहीही कामं घेऊन येतात. दादा, याचं काम केलं पण याने पैसे दिलेच नाही. त्याने पैसे दिले नाही. अरं, मग पैसे दिले कशाला? एवढं तरी कळतं की कोण पैसे देऊ शकतो, कोण चुना लावू शकतो, कोण टोपी घालू शकतो.व्यवहार करणारा माणूस लगेच लक्षात येतो.
अजित पवार स्थानिक संदर्भात बोलले असले तरी त्याचा संदर्भ राज्यातील घटनांशी लावण्यात आला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारवाल्यांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते.
त्याची जबाबदारी निलंबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याच्यावर दिली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून लेटरबॉँब टाकला होता.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने यावरूनच देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणात चौकशी करत आहे. देशमुख यांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
Ajit Pawar says has he become Deputy Chief Minister for recovery? Netkari said you had appointed Home Minister for that!
महत्त्वाच्या बातम्या
- चौकशीच्या दरम्यान पोलीसांसमोर ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी, नवरा राज कुंद्रासोबत झाला जोरदार वाद
- ममता सरकारने पुन्हा काढली खोडली, राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या मोटारीवरील लाल दिवे हटविण्याचा घेतला निर्णय
- आत्ता पूरग्रस्तांना तातडीची मदत द्या, परंतु पूरपरिस्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही करा; फडणवीसांचे प्रतिपादन
- राज्यावरील संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण, पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का्य नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका
Array