विशेष प्रतिनिधी
कुडाळ : जिल्हा बँक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. ईडी सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या राज्यातील अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे.
Ajit Pawar is currently out on bail ; Former MP and BJP leader Nilesh Rane
माजी खासदार आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी एका केलेल्या विधानामुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. राणे म्हणतात, जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अजित पवार यांनीच मदत केलेली होती. पण आता त्यांनाही बँक टिकवायची कशी? हे कळलेले नाहीये. महाविकास आघाडीच्या हातातून जिल्हा बँक कधीच गेलेली आहे.
संसदेत कोकणाची अब्रु घालविणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले यावर बोलू नये, निलेश राणे यांचा हल्लाबोल
पुढे ते म्हणतात की, अजित पवार आज आत बाहेर आहेत तर उद्या आतही जातील. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या अनेक केसेस दाखल आहेत. जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा या सर्व गोष्टींचा खुलासा करू.
सध्या असलेले राज्य सरकार हे तडजोडीतून उभे झालेले आहे. ही जनतेची आघाडी झालेली नाहीये. तीन डाकू एका गावावर डाका टाकण्यासाठी एकत्र येतात तशी परिस्थिती महाराष्ट्र राज्याची आहे, असेदेखील नीलेश राणे यांनी म्हणाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App