अजित पवारांनी ठेवली विकल्या गेलेल्या ६४ कारखान्यांची यादीच समोर, जरंडेश्वर कारखान्याचीच चर्चा कशाला केला सवाल


विशेष प्रतिनिधी

पुणे : जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना मातीमोल किंमतीला विकला गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर अजित पवारांनी तब्बल ६४ सहकारी साखर कारखाने आणि एका सूत गिरणीची यादी समोर ठेवली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याविषयी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत या ६५ व्यवहारांविषयी कुणीच काहीच का बोलत नाही, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.Ajit Pawar give list of 64 sugar factories which were sold, asked why discuss only of Jarandeshwar factory?

जरंडेश्वर प्रकरणावरून पवार म्हणाले, या गोष्टीला १२-१५ वर्ष झाली असतील. मी म्हटलं कशाला आपण त्याला उत्तर द्यायचं. पण त्याचा आता पार अतिरेक झालाय. २५ हजार कोटी, १० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मागच्या सरकारने सीआयडीची चौकशी केली, एसीबीनं चौकशी केली, इओडब्ल्यूनं चौकशी केली. सहकार विभागाने न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून चौकशी केली. त्यात कुणाला काही गैरप्रकार आढळला नाही.यावेळी अजित पवारांनी एकूण ६४ सहकारी साखर कारखाने आणि एक सूत गिरणी अशा ६५ व्यवहारांची यादीच वाचून दाखवली. गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व कारखान्यांचे व्यवहार झाले. नेमक्या किती किंमतीला कोणता कारखाना कुणी विकत घेतला, याची माहिती देताना अजित पवार म्हणाले, मागे लोक म्हणायचे की हे कारखाने मातीमोल किंमतीला विकले जातात.

पण हे व्यवहार पाहाता कोट्यवधींच्या किमतीलाच कारखाने विकले जात आहेत. राज्य सहकारी बँकेने एकूण ३० कारखाने विकले, ६ कारखाने जिल्हा बँकेनं विकले. शासनमान्यतेनं विक्री केलेल्या ६ कारखान्यांमध्ये २००३ साली शेतकरी सहकारी साखर काखाना ३ कोटी ३६ लाखांना विकला गेला.

जिल्हाधिकाऱ्यांनी शासनमान्यतेनं विक्री केली. इतक्या कमी किमतीला झालेल्या व्यवहारांची कुणी चर्चाही करत नाही, कुणी बोलतही नाही. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने कारखान्याकडून दाखल करण्यात आलेली रीट याचिका तीन ते चार वेळा फेटाळून लावण्यात आली.

न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसारच राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली, पण हे कुणी लक्षातच घेत नाहीये. ज्यांच्यामुळे कारखान्याचं नुकसान झालं, तेच अशा पद्धतीने चुकीचं काहीतरी लोकांसमोर सांगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

  • नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा बाप काढला; अजितदादा म्हणाले “नो कॉमेंट्स”
  • चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला
  • महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
  • ‘लसीकरण मोहिमेवर व्हीआयपी संस्कृतीचा दबदबा नव्हता’, पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील टॉप 10 मुद्दे
  • पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Ajit Pawar give list of 64 sugar factories which were sold, asked why discuss only of Jarandeshwar factory?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण