विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंबई- बंगळुरू महामार्गावर पुण्यातील नऱ्हे येथील नवले पुल परिसरात झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 12 जण जखमी झाल्याचे पोलिसानी सांगितले.रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गॅस घेऊन Terrible accident near Navale bridge in Pune; Three killed, 14 injured
निघालेल्या टँकरने १३ सिटर ट्रॅव्हलरला जोराची धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी होऊन सेवा रस्त्यावर पडली. यावेळी सेल्फी गार्डन मध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाले . या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले असल्याचे समजते आहे.
गाडीखाली अडकलेल्या जखमींची घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशामक दलाकडून सुटका करण्यात आली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App