अहमदनगर : भिंगार कॅम्प पोलिसांनी ठाण्याच्या गेटवर लावला ‘नो मास्क, नो कम्प्लेंट’ असा बोर्ड

आता भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना तोंडावर मास्क लावूनच यावे लागणार आहे.Ahmednagar: Bhingar camp police put up a ‘No Mask, No Complaint’ sign at the gate of Thane


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर :अहमदनगर शहरापाठोपाठ भिंगार शहरात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे आता भिंगार कॅम्प पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवर ‘नो मास्क, नो कम्प्लेंट’ असा बोर्ड लावला आहे.दरम्यान आता भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना तोंडावर मास्क लावूनच यावे लागणार आहे.तसेच तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर मास्क नसल्यास त्याला प्रवेश नाकारण्यात येत आहे. करोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहे.नियमांचे पालन करण्यासाठी गेटवर बोर्ड लावण्यात आला आहे.या बोर्डवर ‘नो मास्क, नो कम्प्लेंट’ असा मजकूर लिहिला आहे.

यामुळे नागरिकही बोर्ड पाहून का होईना पोलीस ठाण्यात येताना तोंडावर मास्क लावून येत आहे.दरम्यान रविवारी भिंगार शहरात 55 व सोमवारी 61 बाधित समोर आले. यामुळे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येणार्‍या व्यक्तींना मास्क सक्तीचे करण्यात आले आहे.

Ahmednagar : Bhingar camp police put up a ‘No Mask No Complaint’ sign at the gate of Thane

महत्त्वाच्या बातम्या