मास्क वापरला तर लॉकडाऊन लावणार नाही, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आश्वासन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जर तुम्ही मास्क लावणार असाल तर मी लॉकडाऊन लावणार नाही. सध्या रुग्णालयात भरती करण्यात येणाºयांची संख्या कमी आहे, त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.Delhi Chief Minister Arvind Kejriwal has assured that lockdown will not be imposed if masks are used

देशभरात कोरोनामुळे अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून अनेक कडक निर्बंध लागू झाले आहेत. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.



राज्यात काल 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. तर आज रविवारी 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. राजधानी दिल्लीतही 5 जानेवारी रोजी 5 हजार रुग्ण आढळून आले होते.

आता, शनिवारी हीच रुग्णसंख्या 24 तासांत 20 हजारांवर पोहोचली आहे. आज 22 हजार रुग्णसंख्या असेल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. मात्र, घाबरण्याचं कारण नाही, असे म्हणत केजरीवाल यांनी लॉकडाऊनसंदर्भातही स्पष्टपणे भूमिका मांडली.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal has assured that lockdown will not be imposed if masks are used

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात