कौतुकास्पद ! महिला टीमने प्रथमच केली मालवाहतूक करणाऱ्या रेकची, ट्रेनची सखोल तपासणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवर प्रथमच मालवाहतूक करणाऱ्या रेकची, ट्रेनची सखोल तपासणी दहा जणींच्या महिला टीमने कल्याण गुड्स यार्ड येथे केली. अशा प्रकारचे काम करणारी ही पहिली महिला टीम आहे असे रेल्वेने स्पष्ट केले आहे . स्टील लोडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ४४ बीओएसटी प्रकारच्या रिक्त वॅगनच्या रॅकची तपासणी बुधवारी संपूर्ण महिला टीमने प्रथमच केली. Admirable! For the first time, the women’s team carried out a thorough inspection of the freight rake and train


हैद्राबाद, नागपूरकडेही बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई – अहमदाबाद मार्गासाठी गुजरातमध्ये वेग


महिलांच्या या टीमने गीअर तपासणी, एअर ब्रेक टेस्टिंग, अंडर फ्रेम्सची तपासणी, साइड पॅनेल्स आणि सदोष घटक आणि संबंधित दुरुस्तीसाठी संपूर्ण १० जणींच्या महिला टीमने हे कौतुकास्पद काम केले आहे. रेकची सखोल परीक्षा साडेचार तासात पूर्ण झाली आणि पुढच्या प्रवासासाठी रेक फिट केले गेले. त्यात अर्चना जाधव, ज्योती दामोदरे, अश्वनी पाटील, श्वेता सूर्यवंशी, प्रियांका खोलेकर, दिपाली, सुनीता, सविता, सुजाता आणि खुशबू आदींचा समावेश होता.

मध्य रेल्वेने एप्रिल ते या दोन महिन्यांच्या कालावधीत १२.५७ दशलक्ष टन मालवाहतुक केली तर २०२० मध्ये याच कालावधीत ते ७.५५ दशलक्ष टनांच्या मालवाहतुकीची नोंद झाल्याचे रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

Admirable! For the first time, the women’s team carried out a thorough inspection of the freight rake and train

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात