विशेष प्रतिनिधी
मुंबई – गेली जवळपास ४० वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेली तीन निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. यंदा ही धुरा प्रथमच आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Aditya Thakare will lead in Mumbai Corporation Election
फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी ही निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेऊन ज्युनियर ठाकरे यांनी ही जबाबदारी घेतल्याचे सांगितले जाते. मुंबई महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयात आदित्य ठाकरे यांनी जातीने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या जोडीला विश्वासू नेते अनिल परब असतात.
मागील निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. ही बाब ध्यानात घेत यावेळी भाजपला रोखण्यासाठी युवासेना आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या काम करत असल्याचे शिवसेनेतून सांगितले जाते. त्यामुळे मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे हे स्पष्ट झाले आहे. राज्यात सत्तेत असताना मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. हे ध्यानात घेऊन आदित्य ठाकरे यांनी रणनीती आखण्यास सत्तेत सहभागी झाल्यापासून सुरवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App